घरताज्या घडामोडीप्रवाशाने तिकिटासाठी दिलेले १० रुपयांचे नाणे नाकारल्याने वाहकाला आठ हजाराचा दंड

प्रवाशाने तिकिटासाठी दिलेले १० रुपयांचे नाणे नाकारल्याने वाहकाला आठ हजाराचा दंड

Subscribe

एका एसटी बसच्या वाहकाने (कंडक्टर) प्रवाशाने तिकीटासाठी दिलेले १० रुपयांचे नाणे घेण्यास नाकारल्याने त्याच्याविरोधात ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उस्मानाबादमध्ये ही घटना घडली आहे.

एका एसटी बसच्या वाहकाने (कंडक्टर) प्रवाशाने तिकीटासाठी दिलेले १० रुपयांचे नाणे घेण्यास नाकारल्याने त्याच्याविरोधात ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उस्मानाबादमध्ये ही घटना घडली आहे. या एसटी बसच्या वाहकाविरोधात उस्मानबाद ग्राहक आयोगाने आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित बस वाहक हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोतील असल्याचे समजते. (msrtc conductor consumer commission imposes fine of rs 8000 due to rejection of rs 10 coin by passenger for ticket)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद या प्रवासाचे नाव आहे. ही घटना २२ मे २०१८ मध्ये घडली होती. या दिवशी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद हे बार्शी डेपोच्या गाडीने वैराग ते उस्मानाबाद येण्यासाठी एसटीतून (एमएच२०डी ८१६९) प्रवास करीत होते. त्यावेळी संबंधित एसटी बसचे वाहक बी.वाय.काकडे यांनी प्रवाशी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांना तिकीट काढण्यासाठी रकमेची मागणी केली. त्यावेळी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवून १० रूपयाचे एक नाणे व ५ रूपयाचे एक नाणे दिले होते. मात्र, वाहक काकडे यांनी १० रूपयाचे नाणे चालत नसल्याचे सांगितले.

एसटी बसचे वाहक काकडे यांनी १० रूपये नाणे नाकारले. त्याबद्दल अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी उस्मानाबाद ग्राहक आयोगाकडे कंडक्टर काकडे व बार्शी डेपोविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर उस्मानबाद ग्राहक आयोगाने वाहकाविरोधात निकाल दिला. त्यानुसार, अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश केले.

- Advertisement -

दरम्यान, १० रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याच्या भीतीने मराठवाड्यात कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत. सर्वसामान्य नागरिक, काही विक्रेते त्रस्त झाले आहेत. बहुतेकदा काही ग्राहक चिल्लर सांभाळायला अडचण नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारत नाहीत. मात्र दहा रुपयांचे नाणे हे भारतीय चलनात असून ते कोणालाही नाकारता येत नाही.

“१० रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो”, असे रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – अंधेरीच्या चित्रकूट मैदानाजवळ भीषण आग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -