घरताज्या घडामोडीपुणे पालिकेत ८७ जागा महिलांसाठी, ४६ जागा ओबीसींसाठी राखीव; खुल्या गटातील इच्छुकांचा...

पुणे पालिकेत ८७ जागा महिलांसाठी, ४६ जागा ओबीसींसाठी राखीव; खुल्या गटातील इच्छुकांचा हिरमोड

Subscribe

बालगंधर्व रंगमंदिरात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत सोडत कार्यक्रम पार पडला.

पुण्यातील ५८ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली आहे. येथे एकूण १७३ जागा असून ८७ जागांसाठी महिला आरक्षण तर ४६ जागा ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत सोडत कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना दणका, ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित

- Advertisement -

ओबीसी आरक्षणामुळे पुणे पालिकेत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे घरातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे, अन्यथा इतर जागेवरून निवडणूक लढवावी लागणार आहे.

परंतु, प्रभाग १७ मध्ये एक जागा सर्वसाधारण असेल, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आणि एक जागा मागासवर्गीय महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांची गर्दी असलेल्या प्रभागात थोडा हिरमोड झाला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील दीपक पोटे, प्रभाग क्रमांक 17 मधील हेमंत रासने अशा काही नगरसेवकांची अडचण या सोडतीनंतर होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबईत एकूण २५ जागा आरक्षित, पालिकेत दिसणार महिला राज

पुणे महापालिकेतील ५८ पैकी सात प्रभाग पूर्णतः आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवरून खुल्या गटातील उमेदवाराला निवडणूक लढवता येणार नाही. प्रभाग क्रमांक तीन लोहगाव-विमान नगर, प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क-मुंढवा, प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत-दत्तवाडी, प्रभाग क्रमांक 39 मार्केटयार्ड-महर्षी नगर, प्रभाग क्रमांक 42 रामटेकडी-सय्यद नगर, प्रभाग क्रमांक 46 मोहम्मद वाडी-उरळी देवाची तसेच प्रभाग क्रमांक 47 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागांचा यात समावेश आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -