घरमहाराष्ट्रमुंबई अंबा एक्स्प्रेस उद्यापासून २० एप्रिलपर्यंत बंद

मुंबई अंबा एक्स्प्रेस उद्यापासून २० एप्रिलपर्यंत बंद

Subscribe

रेल्वे मंत्रालयाद्वारे भुसावळ यार्डाच्या री मोडलिंग कार्य करिता ५ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत ४४ मेल व एक्सप्रेस गाड्या आणि ३४ पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा फटका अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेसलाला ही बसला आहे.

रेल्वे मंत्रालयाद्वारे भुसावळ यार्डाच्या री मोडलिंग कार्य करिता ५ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत ४४ मेल व एक्सप्रेस गाड्या आणि ३४ पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेसलाला ही बसला आहे. अंबा एक्स्प्रेस हि उद्या पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीकर जनतेमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. मात्र हा प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत अन्यायकारक असून घेतलेला निर्णय रद्द न केल्यास सावळ व्यतिरिक्त ऑनलाइन द्वारे भरविण्यात आलेल्या गाड्या रेल रोको करून कळविण्यात येईल असा इशारा खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

४४ मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द

रेल्वे मंत्रालयाद्वारे सदरील कार्य हे खरोखर करावयाचे असल्याने घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा सुमारे १२० दिवसापूर्वी प्रवाशांनी आपल्या आरक्षण उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुळे करून ठेवले असताना ५ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत ४४ मेल व एक्सप्रेस गाड्या रद्द करणे हे प्रवाशांच्या हिताचे नसल्याने रेल्वे मंत्रालयाद्वारे घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा व भुसावळ कार्डाच्या कामासंदर्भात इतर पर्याय अवलंबिण्यात यावे अशी विनंती खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल रेल्वे बोर्डाच्या सदस्यांकडे केली आहे. तर, अमरावती महानगर यात्री संघटनेच्या वतीने हि रेल्वे सेवा वाशीम,पुन्हा किंवा लातूर मार्ग वळविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -