घरक्राइमMumbai Crime : विमान तिकिट बुक करण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Mumbai Crime : विमान तिकिट बुक करण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Subscribe

अंधेरीतील मरोळ, हसनपाडा रोड, मित्तल कमर्शिया येथे एक बोगस कॉल सेंटर सुरु असून, या कॉल सेंटरमधून अनेकांना विमान तिकिट बुक करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती.

मुंबई : स्वस्तात विमान तिकिट बुक (flight tickets) करण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणार्‍या एका बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अधिकार्‍यांनी कारवाई करुन एका महिलेसह 13 जणांना अटक केली. या टोळीने सोशल मीडियावर जाहिरात करुन अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.(A gang of frauds on the lure of booking flight tickets is jailed)

अंधेरीतील मरोळ, हसनपाडा रोड, मित्तल कमर्शिया (Marol, Hasanpada Road, Mittal Commerce, Andheri) येथे एक बोगस कॉल सेंटर सुरु असून, या कॉल सेंटरमधून अनेकांना विमान तिकिट बुक करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर एसी.पी. महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट आठच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी तिथे एक बोगस कॉल सेंटर सुरु असल्याचे तसेच तिथे 13 जण तिकिट बुक करत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

या 13 जणांना करण्यात आली अटक

आतिक अकबरअली रेहमान, मृदुल अशोक जोशी, मोहम्मद फैजान गुलशाद अहमद, आशिष विनय शर्मा, सलमान सईद मोहम्मद याकूब सिद्धीकी, देवेंद्र तिर्थ सिंह, मोहम्मद उमेर दिलशाद अहमद शेख, शहबाज सलीम शेख, अंबेश अवधेशकुमार ऊर्फ गौरव, साहिल दर्शन सिंह ऊर्फ दिपकुमार, संतोष रमेशचंद्र कांडपाल, उपासना अशोक सिंग, श्रीराम मुकूंदकुमार मथिलकथ अशी या तेराजणांची नावे आहेत. यातील उपासना या महिलेस 41 अ नोटीस देऊन जाऊ देण्यात आले तर इतर 12 आरोपींना लोकल कोर्टाने 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : कामात कसूर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची एक वर्षाची वेतनवाढ थांबवली; पोलीस आयुक्तांचे आदेश

- Advertisement -

7 लाखाचा मुद्देमाल जप्त

यावेळी या कार्यालयातून पोलिसांनी 28 लॅपटॉप, 40 मोबाइल, दोन राऊटर आणि गुन्ह्यांविषयी इतर कागदपत्रे असा 7 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तिथे उपस्थित एका महिलेसह 13 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले होते.

हेही वाचा : Mumbai Crime : चहापत्तीच्या पाकीटात घेऊन जात होता दीड कोटींचे हिरे; वाचा, कसा फसला त्याचा डाव

अशी करत होते फसवणूक

चौकशीत ही टोळी विमान प्रवासांच्या इच्छुक ग्राहकांना विशेषता कॅनडा देशांत राहणार्‍या नागरिकांना, देश-विदेशातील नागरिकांना इंटरनेट, व्हॉटअपद्वारे संपर्क साधून विमान तिकिट बुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून पैसे घेत होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त केले जात होते. कंपनीची जाहिरात म्हणून त्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरात करुन स्वस्तात विमान तिकिट बुक होईल अशी बतावणी केली होती. त्यांच्या या बतावणी भुलून अनेकांनी त्यांच्याकडे तिकिट बुक केले होते. त्यामुळे या 13 जणांना नंतर पोलिसांनी अटक केली.

या कलमान्वये दाखल करण्यात आला गुन्हा

त्यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज तयार करुन फसवणुक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील उपासना या महिलेला चौकशीनंतर सोडून देण्यात आले तर इतर बाराजणांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -