घर क्राइम Mumbai Crime : चहापत्तीच्या पाकीटात घेऊन जात होता दीड कोटींचे हिरे; वाचा,...

Mumbai Crime : चहापत्तीच्या पाकीटात घेऊन जात होता दीड कोटींचे हिरे; वाचा, कसा फसला त्याचा डाव

Subscribe

या झडतीत डोळे विस्फारून जातील असंच काहीसं बाहेर निघलं. त्याच्या त्या बॅगमध्ये असलेल्या चहापत्तीच्या पाकिटात होते तब्बल दीड कोटींचे हिरे.

मुंबई : तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (At Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) आला, त्याच्या हातात एक भलीमोठी बॅग होती. तो जाणार होता दुबईला. काही वेळ तो विमानाची वाट पाहत तिथेच थांबला, काही वेळेने विमान आले, आणि तो त्याकडे चालत सुटला. मात्र, याच वेळी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. एकदम घडलेल्या या प्रकारालामुळे काहीसा तो दचकला, पण अधिकाऱ्यांनी तोपर्यंत त्याच्याकडील बॅगेची झाडाझडती घेतली. या झडतीत डोळे विस्फारून जातील असंच काहीसं बाहेर निघलं. त्याच्या त्या बॅगमध्ये असलेल्या चहापत्तीच्या पाकिटात होते तब्बल दीड कोटींचे हिरे.(Diamonds worth one and a half crores.)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दीड कोटी रुपयांचे हिरे जप्त केले असून याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताला बुधवारी दुबईला जाणाऱ्या विमानात बसण्याची वाट पाहत असताना अटक करण्यात आली. चहाच्या पाकिटात हिरे लपवण्यात आला होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MegaBlock : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत बनवलेले हिरे

जप्त केलेले हिरे 1559.6 कॅरेटचे आहेत. जे पूर्णपणे नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत बनवलेले आहेत. ज्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. कस्टम अधिकार्‍यांनी सांगितले की, जप्त केलेले हिरे चतुराईने चार पॅकेटमध्ये लपवले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगाच्या वाटेवर; शिंदे गटातील आमदाराचा दावा

कोचीन कस्टम अधिकाऱ्यांनीही केली होती कारवाई

याआधी कोचीन कस्टम अधिकाऱ्यांनी शुक्रवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या मागील टॉयलेटमधून सुमारे 85 लाख रुपयांचे सोने जप्त केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सोने दोन बेवारस बॅगमध्ये होते. या सोन्याचे वजन अंदाजे 1,709 ग्रॅम होते.

- Advertisment -