घरमहाराष्ट्रठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगाच्या वाटेवर; शिंदे गटातील आमदाराचा दावा

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगाच्या वाटेवर; शिंदे गटातील आमदाराचा दावा

Subscribe

काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या कारवाई संशयीत आरोपी सुजीत पाटकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कोरोना काळातील घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीकडे साक्ष दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय होईल अशी परिस्थिती मागील 2019 पासून झालेल्या राजकीय उलथापालथीतून दिसून येते. त्यातच 40 समर्थक आमदारांसह भाजपसोबत गेलेल्या शिंदे यांच्या गटातील आमदार,नेते आणि ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. आता अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे कुटुंबातील एका व्यक्ती तुरुंगात जाणारच असा दावा केल्याने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या कारवाई संशयीत आरोपी सुजीत पाटकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कोरोना काळातील घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीकडे साक्ष दिली आहे. ते आता ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे आरोप करीत आहेत. याबाबत मात्र, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना विचारले असताना त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य करुन राज्यात खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Nitin Gadkari : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; हवेतून चालणार बस

असा साधला संजय शिरसाटांनी थेट निशाणा

ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे सुजीत पाटकर यांनी जबाबात म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘यांना उगाच चौकशीसाठी बोलावले का? मारून मुटकून आरोप सिद्ध करता येत नाहीत. गुन्ह्यात अडकल्याचे पुरावे असतील तरच शिक्षा होते. तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर न्यायालय सोडते ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे जे कोणी असेल तर त्यांना सांगतो की आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे,’ असा इशारा शिरसाट यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा : आजपासून दिल्ली केंद्राच्या ताब्यात, डेटा संरक्षण विधेयकाचेही कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची मिळाली मंजूरी

यामुळे केली होती सुजीत पाटकर यांना अटक

ईडीने 20 जुलै रोजी सकाळीच सुजीत पाटकर यांना अटक केली होती. महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात पाटकर यांना अटक करण्यात आली होती. सुजीत पाटकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला होता, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या प्रकरणाची ईडीने दखल घेऊन चौकशी केली होती. या प्रकरणी सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशीही केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती. त्यानतंर त्यांना 20 जुलै रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डॉ. किशोर बिचुले यांचाही या घोटाळ्याशी संबंध असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -