घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा हायवेवर एसटी बस जळून खाक; कोकण मार्गावर मात्र वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा हायवेवर एसटी बस जळून खाक; कोकण मार्गावर मात्र वाहतूक कोंडी

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वडपाले येथे सकाळी ६.४५ मिनिटांच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वडपाले येथे सकाळी ६.४५ मिनिटांच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत एसटीमधील ५७ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे निघाली होती. इचलकरंजी आगाराची (कोल्हापूर विभाग) बस क्रमांक MH 20 BL 4209 ही मुंबई-दहिवली मार्गावर धावत असताना अचानक बसने पेट घेतला.

- Advertisement -

कोकणात जाणाऱ्या मुंबई-चिपळूण-दहिवड या एसटी बसने अचानक पेट घेतल्यानंतर एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत बस मुंबई-गोवा महामार्गावर उभी केली. यामुळे एसटीत असणारे सर्व प्रवासी सुखरुप खाली उतरले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी एसटीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग मोठ्या प्रमाणात लागल्याने एसटी बस जळून खाक झाली.

fire on st bus
एसटी बसला आग

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा खोळंबा 

एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ही दुर्घटना घडल्याने अनेक समस्यांवर मात करत मोठ्या संख्येने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेन ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुंळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक टोल फाटा नांदवी मार्गे गोरेगाव अशी वळवण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग

मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 31, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -