घरताज्या घडामोडीनव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत हल्ला होण्याची शक्यता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत हल्ला होण्याची शक्यता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Subscribe

नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईवर हल्ला करण्याचा कट खलिस्तानी आतंकवादी रचत असल्यामुळे मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मुंबई पोलिसांना हल्ला होणार असल्याची माहिती दिली असून सर्वत्र बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसकडून सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत खलिस्तानी आतंकवाद्यांकडून हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत मोठा हल्ला करण्यासाठी कट रचण्यात येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईत हल्ला करुन देशात आतंकवादी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून रेल्वे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी अधिक गर्दी होते तिथे चोख बंदोबस्त करण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

परदेशातून खलिस्तान्यांची भारतावर नजर

कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि पाकिस्तानसह परदेशात बसलेले खलिस्तानी दहशतवादी भारतविरोधात अनेक दिवसांपासून कारवाया करत आहेत. अलीकडच्या काळात भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात उचललेल्या कठोर पावलांमुळे खलिस्तानी खवळले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय खलिस्तानी दहशतवाद्यांवर भारताविरोधात कट रचण्यासाठी दबाव आणत आहे. यामुळे खलिस्तानी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Corona Virus: राज्यात कोरोनाचा स्फोट, निर्बंधाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्यावा लागेल, राजेश टोपेंचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -