घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे रेल्वेसेवा हळूहळू ट्रॅकवर!

मुंबई-पुणे रेल्वेसेवा हळूहळू ट्रॅकवर!

Subscribe

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, ही रेल्वे वाहतूक आजपासून सुरळीत होणार आहे.

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. ही रेल्वे सेवा आजपासून सुरळीत होणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीन सिंहगड, पुणे मुंबई लोहमार्गावर कोसळलेली दरड आणि मुंबईतील जोरदार पावसामुळे मागील दोन दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक ठप्प झाले होते. रविवारीही पुणे मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. मात्र, रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असून कर्जत ते लोणावळा दरम्यान घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या सोडून अन्य गाड्या नियोजित वेळेत धावणार आहेत.

पावसामुळे शनिवारी आणि रविवारी बंद असलेल्या गाड्या सोमवारी नियोजित वेळेवर धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र आज, सोमवारी अचानक पाऊस वाढल्यास स्थिती पाहून वेळेत बदल केले जातील, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

सोमवारी रद्द करण्यात आलेली ट्रेन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -