घरमुंबईघाटकोपरमध्ये शिवसैनिक बंटीची हत्या

घाटकोपरमध्ये शिवसैनिक बंटीची हत्या

Subscribe

वाढदिवसाच्या दिवशी तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

घाटकोपर येथे एका २७ वर्षीय तरुणाची वाढदिवसाच्या दिवशी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नितेश सावंत उर्फ बंटी असे या मृत तरुणाचे नाव आहे. ७ – ८ जणाच्या जमावाने या तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

यामुळे करण्यात आली हत्या

घाटकोपर येथे एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची हत्या करण्यात आली आहे. बंटीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु असताना त्या ठिकाणी साते ते आठ जणांनी येऊन बंटी याच्यावर वार करत त्याची हत्या केली. तुर्तास, हत्येमागचे कारण अस्पष्ट असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तरुणाचे काही दिवसांपूर्वी काहीजणांसोबत भांडण झाले होते अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे.


हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पोटच्या तीन मुलांचा खून करून आईची आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -