घरताज्या घडामोडीदुचाकी चालवताना चप्पल घातल्यास 'इतका' भरावा लागेल दंड

दुचाकी चालवताना चप्पल घातल्यास ‘इतका’ भरावा लागेल दंड

Subscribe

दुचाकी चालवताना दुचाकीस्वाराला वाहचतुकीच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचदा दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक दुचाकीस्वारांना अजूनही वाहतुकीचे संपूर्ण नियम माहित नाही.

दुचाकी चालवताना दुचाकीस्वाराला वाहचतुकीच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचदा दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अनेक दुचाकीस्वारांना अजूनही वाहतुकीचे संपूर्ण नियम माहित नाहीत. या नियमांमधील एक महत्वाचा नियम म्हणजे चप्पल घालून गाडी चालवू नये. 2019 साली या नियमाची माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप बहुतेक दुचाकी चालकांना या नियमाची माहिती नाही. (mumbai traffic police challan for bike riding in slippers)

चप्पल घालून दुचाकी चालवण्यास परवानगी नाही. सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो. म्हणजेच, जर तुम्ही चप्पल घालून बाइक चालवली तर तुम्हाला 1000 रुपयांचे चलन होऊ शकते.

- Advertisement -

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हा गुन्हा मानला जातो, ज्यासाठी काही प्रकरणांमध्ये दंड तसेच तुरुंगवासाची तरतूद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास हजारो रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि अनेक वर्षे तुरुंगवासही होऊ शकतो. दरम्यान, काही ट्रॅफिक नियम आहेत जे फार कमी लोकांना माहित असतात. शिवाय, बऱ्याचदा लोक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर त्यांचे चलान कापले जाते. यातीलच एक नियम म्हणजे चप्पल घालून दुचाकी चालवण्याबाबत आहे.

“बाईक चालवताना चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर दंड भरावा लागेल. चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवणे हे ट्रॅफिक नियमांच्या विरोधात आहे. हा खूप जुना नियम असून सक्तीने लागू करण्यात येत नव्हता. पण आता जर चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवली तर दंड भरावा लागणार. गिअर असलेली बाईक तुम्ही चप्पल आणि सँडल घालून चालवली तरच तुमच्यावर कारवाई होऊ शकते”, असे ट्रॅफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2019 साली सांगितले होते.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युतीची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -