घरताज्या घडामोडीजे घाबरले ते आझाद.., गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा खोचक टोला

जे घाबरले ते आझाद.., गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा खोचक टोला

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. सर्व पदांसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जे घाबरले ते आझाद असा खोचक टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर लगावला आहे.

जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे. २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले, तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला होता.

- Advertisement -

काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत, असं आझाद म्हणाले.

गुलाब नबी आझाद हे काँग्रेसमधील एका मोठा चेहरा मानले जातात. ते यापूर्वी राज्यसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे आता पक्षातील अनेकांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नियुक्त्यांमध्ये त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जायचा. अलीकडेच नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी बोवलावे होते. यावेळी काँग्रेसने केलेल्या देशव्यापी आंदोलनात आझाद सहभागी झाले होते. याशिवाय पत्रकार परिषद देखील घेतली होती. मात्र गेल्या काही काळापासून आझाद काँग्रेसवर नाराज होते.

- Advertisement -

हेही वाचा : गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम; सोनिया गांधींना पाठवले पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -