घरमहाराष्ट्रअनैतिक संबंधातून पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

अनैतिक संबंधातून पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

Subscribe

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मण खुटेकर या आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमध्ये घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मण तुकाराम खुटेकर (३०) या आरोपीला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेमध्ये अशोक लक्ष्मण बिरादार (३२) यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगवीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण खुटेकर यांनी अनेकदा आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरापासून दूर राहायला सांगितले होते. तसेच अशोक बिरादार याला अनेकदा समजावून आपल्या घरी येण्यास देखील बंदी घातली होती. मात्र, तरी देखील हे दोघे भेटतच होते. गेल्या काही दिवसांपासून अशोक हा लक्ष्मणच्या पत्नीला भेटण्यासाठी घरी येत असल्याची माहिती लक्ष्मणने पोलिसांना दिली. याचाच राग त्याच्या मनात होता. मंगळवारी संध्याकाळी अशोक हा लक्ष्मणच्या पत्नीला भेटायला आला तेव्हा लक्ष ठेवून असलेला लक्ष्मणने त्याला पाहिले. आपण अनेकदा सांगून देखील या दोघांचे भेटणे सुरुच असल्याने लक्ष्मणला राग आला. दरम्यान, लक्ष्मण आणि अशोक या दोघांमध्ये वाद झाला. यातूनच लक्ष्मणने पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार केले. यात अशोकचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राची हत्या

वाचा – अनैतिक संबंधाची पोलखोल; मित्रानेच केला मित्राचा खून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -