घरमहाराष्ट्रनागपूरगाडीची जबाबदारी पार्किंग चालकाचीच; तक्रार निवारण आयोगाचा निर्वाळा

गाडीची जबाबदारी पार्किंग चालकाचीच; तक्रार निवारण आयोगाचा निर्वाळा

Subscribe

याप्रकरणी मनोज झा यांनी आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. ते ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. त्यांनी पार्किंगचे पाच रुपयेही दिले होते. त्यावेळी हँडल लाॅक न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. काही वेळाने काम आटोपून ते पुन्हा माघारी निघाले. तेव्हा त्यांची गाडी तेथे नव्हती. पार्किंगची व्यवस्था सांभाळणाऱ्याकडे त्यांनी गाडीबाबत विचारले. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडेही तक्रार नोंदवली.

नागपूर : पार्किंगमधून गाडी चोरी गेल्यास त्याची जबाबदारी पार्किंग चालकाचीच असल्याचा निर्वाळा नागपूर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंग चालकाला पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

याप्रकरणी मनोज झा यांनी आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. ते ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. त्यांनी पार्किंगचे पाच रुपयेही दिले होते. त्यावेळी हँडल लाॅक न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. काही वेळाने काम आटोपून ते पुन्हा माघारी निघाले. तेव्हा त्यांची गाडी तेथे नव्हती. पार्किंगची व्यवस्था सांभाळणाऱ्याकडे त्यांनी गाडीबाबत विचारले. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडेही तक्रार नोंदवली.

- Advertisement -

या तक्रारीवर आयोगाकडे सुनावणी झाली. माझी गाडी ४० हजार रुपयांची होती. मी पार्किंगचे शुल्क भरले होते. त्याची पावतीही माझ्याकडे आहे. पार्किंगमधील गाडीची जबाबदारी पार्किंग चालकाची आहे. मला नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी झा यांनी आयोगाकडे केली.

आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. आम्ही फायद्यासाठी पार्किंगचे व्यवस्थापन करत नाही. ना नफा ना तोटा या तत्त्वावर या पार्किंगचे व्यवस्थापन चालते, असा दावा पार्किंग चालकाने आयोगाकडे केला. तो आयोगाने फेटाळून लावला. पार्किंगचे पैसे आकारता मग तेथील वाहनाची जबाबदारी तुमचीच आहे. त्यामुळे झा यांच्या वाहनाची जबाबदारीही तुमचीच आहे. त्यांना तुम्ही नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश आयोगाने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार्किंगचे व्यवस्थापन बघणाऱ्या संघटनेला दिले आहेत. या आदेशाने झा यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

पार्किंगमधून वाहन चोरी झाल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. बहुतांश वेळा वाहनांची तोडफोड केली जाते. पार्ट्स चोरीला जातात. चालकाचे नुकसान होते. मात्र गार्किंग चालकाकडून त्याची भरपाई दिली जात नाही. नागपूर जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या या निर्णयामुळे यापुढे तरी पार्किंग चालक जबाबदारीने वाहनांची काळजी घेतील.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -