घरताज्या घडामोडीनारायण राणे दिल्ली दौऱ्यावर, एका भाजप नेत्याचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता

नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर, एका भाजप नेत्याचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता

Subscribe

शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा कोकणात विस्तार करण्यासाठी नारायण राणे यांची मदत भाजपला होऊ शकते.

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर आहेत. नारायण राणे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. राणेंच्या दौऱ्यामुळे राज्यातील वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात उलथापाथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राणे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. राज्यातील एका भाजप नेत्याचं मंत्रीपद धोक्यात असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये मोठी जबाबदारी राणे कुटुंबीयांना देण्यात आले असून राणेंची केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक वाढली आहे.

भाजप नेते नारायण राणे यांनी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री मंडळात मंत्रीपदाचा विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपनं नारायण राणे यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. परंतु केंद्रीय मंत्रीमंडळाचा कोटा ८० खात्यांचा आहे. सध्या मोदींच्या मंत्री मंडळात ६० मंत्री असून अन्य विभागाचा भारही वाहत आहेत. यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंची वर्णी लागणे निश्चित असल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

नारायण राणेंची भाजपला कोकणात मदत

भाजप नेते नारायण राणे यांची कोकणात मजबूत पकड आहे. यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा कोकणात विस्तार करण्यासाठी नारायण राणे यांची मदत भाजपला होऊ शकते. यामुळे नारायण राणे यांना मंत्रीमंडळमध्ये घेतल्यास भाजपला फायदाच होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचा स्वभाव अक्रमक असल्यामुळे त्यांना मंत्री बनण्याची संधी मिळू शकते. भाजप खासदार अरविंद सावंत यांना देण्यात आलेलं मंत्रीपद अजूनही रिक्त आहे. सध्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर या पदाचा भार आहे. युती तुटल्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे सावंत यांचे मंत्रीपद राणेंना मिळण्याची शक्यता आहे.

कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा

सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात अधिक खाती रिक्त आहेत. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या एका नेत्याचं मंत्रीपद नारायण राणे यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे हा नेता कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -