घरदेश-विदेशदेशात महागाईने तोडले आजवरचे सर्व विक्रम, मे महिन्यात गाठला नव्याने १२.९४ टक्क्यांचा...

देशात महागाईने तोडले आजवरचे सर्व विक्रम, मे महिन्यात गाठला नव्याने १२.९४ टक्क्यांचा टप्पा

Subscribe

देशात एकीकडे कोरोना संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढही सतत सुरु आहे. यातच इतर वस्तुंच्या किंमतीतही भरमसाठ दरवाढ झाली असून मे महिन्यात महागाईच्या दर विक्रमी पातळीवर गेला आहे. घाऊक मूल्यावर आधारित महागाईच्या दराने मे महिन्यात नव्याने १२.९४ टक्क्यांचा टप्पा पार केला आहे. हा महागाईचा सलग पाचवा महिना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी महागाई सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेर जात आहे. यात विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच महिन्यात महागाईचा दर उणे ३. ३७ टक्क्यांवर पोहचला होता.

मे महिन्यात महागाईने नव्याने गाठला १२.९४ टक्क्यांचा टप्पा

गेल्या काही महिन्यांपासून देशात सतत वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे हाल पूर्ते केले आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगणाला भिडले आहे. एप्रिल महिन्यात या महागाईचा दर १०.४९ टक्के होता. यात आज वाणिज्य मंत्रालयाने महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. ज्यात मे २०२१ मध्ये महागाईचा दर १२.९४ टक्क्यांवर पोहचला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर गेल्या महिन्यात देशात पेट्रोल, डिझेल, नाफ्ता, फर्नेस ऑईल या पेट्रोलियम उत्पादनांमध्ये वाढ झाली आहे. त्याशिवाय कारखाना उत्पादित वस्तूंच्या किंमतींनीदेखील नावे उच्चांक गाठले आहेत.

- Advertisement -

इंधन आणि वीज या श्रेणीत महागाईचा दर ३७.६१ टक्के

तर इंधन आणि वीज या श्रेणीत गेल्या महिन्यात महागाईचा दर ३७.६१ टक्के झाला आहे. तर एप्रिलमध्ये या श्रेणीचा दर २०.९४ टक्के होता. कारखानात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा महागाईचा दर एप्रिल महिन्यात ९.०१ टक्के होता तो मे महिन्यात १०.८३ टक्क्यांवर पोहचला. तर खाद्य वस्तूंचा महागाईचा दर गेल्या महिन्यात घसरला आहे. त्यामुळे खाद्यान्न वस्तूंचा महागाई दर आता ४.३१ टक्के झाला आहे.

महागाईवरून केंद्रावर व्यक्त केला जातोय रोष  

कोरोनामुळे पुर्ते हैराण झालेल्या नागरिकांचे इंधन दरवाढीने आधीच कंबरडे मोडले आहे. यात आता जीवनावश्यक वस्तू, खाद्य तेल, कडधान्य, साबण, तांदूळ अशा अनेक वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने तुटपुंज्या पगारात महिन्याचे आर्थिक नियोजन करावे तरी कसे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यात मोदींच्या अच्छे दिन येणार या टॉग लाईनवरून सोशल मीडियावर मिम्स, मेसेजचा पुर आला आहे. तर विरोधकांनीही महागाईवरून केंद्राला धारेवर धरले आहे.

- Advertisement -

‘जी-७’ शिखर परिषदेमुळे चीन अस्वस्थ? म्हणतोय, काही देश एकत्र येऊन जगावर राज्य करु शकत नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -