घरट्रेंडिंगRahul Gandhi on EVM : ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाही, राहुल...

Rahul Gandhi on EVM : ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाही, राहुल गांधींसह विरोधकांचा आरोप

Subscribe

मुंबई – इंडिया आघाडीच्या शिवतीर्थावरील सभेत प्रकाश आंबेडकरांपासून फारुख अब्दुल्ला, आप आणि राहुल गांधींपर्यंत अनेक नेत्यांनी ईव्हीएमविरोधात मोर्चा उघडला. ज्या प्रमाणे राजाचा जीव पोपटात असतो, तसा नरेंद्र मोदींचा जीव हा ईव्हीएममध्ये असल्याचा आरोप आप नेत्याने केला. राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिन हे नरेंद्र मोदींच्या विजयाचे कारण असल्याचा थेट आरोप केला. निवडणूक आयोग ईव्हीएमवरील कोणत्याही तक्रारीला दाद देत नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अशावेळेस विरोधी पक्षाने ईव्हीएमविरोधात आवाज बुलंद केला आहे.

ईव्हीएमशिवाय मोदी जिंकू शकत नाही

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणुकीत जिंकूच शकत नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनीही केला. त्यांच्या आधी इंडिया आघाडीचे सहकारी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही ईव्हीएमविरोधात आवाज उठवला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ईव्हीएम हद्दपार केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या नेत्यानेही नरेंद्र मोदींचा जीव हा ईव्हीएममध्ये आहे. ईव्हीएमशिवाय ते काहीच नाही, असे म्हटले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही राहुल गांधींना ईव्हीएमविरोधात लढण्याचे आवाहन केले. ईव्हीएम विरोधातील लढाईत आम्ही तुमच्या सोबत राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिन हे मोदींच्या जिंकण्याचे कारण असल्याचे सांगितले. निवडणूक आयोग ईव्हीएमवर बोलायला तयार नसल्याचे सांगत ते म्हणाले की, आम्ही ईव्हीएम कसे काम करते याची विचारणार आयोगाकडे केली, मात्र त्यावर ते बोलायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाकडे आम्ही काही मशिनची मागणी केली आणि ते आमचे तज्ज्ञ तपासतील असे सांगितले, तर मशिन देण्यासही त्यांनी नकार दिला, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मुखवटा, देश एक अदृष्य शक्ती चालवते – राहुल गांधी 

- Advertisement -

ईव्हीएमसोबत असलेल्या व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून पडणाऱ्या चिठ्ठीची मोजणी झाली पाहिजे, ही देखील मागणी राहुल गांधींनी यावेळी केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाला पत्र लिहिले की ईव्हीएममधील मतांची मोजणी करता, त्यासोबतच व्हीव्हीपॅटमधील पेपरची मोजणी करा, त्यालाही आयोगाने नकार दिला.

ईव्हीएम मशिनविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईतील सभेत एकाच मंचावरुन विविध पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा 2024 चे रणशिंग फुंकले, त्यासोबतच ईव्हीएमविरोधातही मोर्चा उघडला आहे.

हेही वाचा : VBA : सोबत असू किंवा नसू, आपल्याला लढावे लागेल; राहुल गांधींसमोरच प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -