घरमहाराष्ट्रनाशिक३६५ जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक मिळणार?; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

३६५ जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक मिळणार?; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

Subscribe

नाशिक : डीवायएफआय संघटनेने ३६५ जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक नसल्याने साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल, जिल्हा शिक्षण अधिकारी नितीन बछाव व कोळी यांच्याशी मंगळवारी (दि. १२) सुरगाणा-कळवण मतदार संघाचे माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत, माजी उपसभापती कॉ. इंद्रजीत गावीत, कॉ. सावळीराम पवार, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय) संघटनेचे अध्यक्ष नितीन गावीत, उपाध्यक्ष अशोक धूम, तुळशीराम खोटरे, चंद्रकांत वाघेरे यांच्या शिष्टमंडळासी मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत चर्चा झाली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी तालुक्यातील ३६५ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा केली, येत्या दि. २८ पर्यंत शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल यांनी तालुका व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या २८ तारखेपर्यंत सर्व शाळांवर प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख आशा जागा भरून तालुक्यातील विध्यार्थ्यांना नियमित अध्यापन करणे सुरु होईल असे सांगितले. आशा वर्कर्स यांच्या कोरोना काळातील २४ महिन्यांचे मानधन मिळवून देण्यास पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे १५ दिवसांत तालुक्यातील शाळांवर ३६५ शिक्षक पाठविण्याची नियोजन प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरात लवकर तालुक्यातील शाळांवर शिक्षक येतील याची खात्री देत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या आश्वासनानंतर संघटनेने तालुकाध्यक्ष नितीन गावीत, उपाध्यक्ष अशोक धूम, तुळशीराम खोटरे आणि माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले. गावित यांनी सांगितले की, १५ दिवसांत प्राथमिक शिक्षक शाळेवर पाठविण्याचे आश्वासन दिले आहे, आशा वर्कर्स यांना कोरोना काळातील दोन वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामूळे तूर्तास आपण हे साखळी आंदोलन माघे घेण्याचा निर्णय घेत आहोत. यावेळी डीवायएफआय, एसएफआय संघटनेने पदाधिकारी, सर्व सदस्य, माजी आमदार जे.पी. गावित, कॉ. इंद्रजीत गावित, किसानसभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आशा वर्कर्स, नगरपंचायतचे आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

..तर पुन्हा आंदोलन

कॉ. जे. पी. गावित यांनी दिलेल्या आश्वासनानुसार १५ दिवसांत तालुक्यात प्राथमिक शिक्षक आले नाहीत तर २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी पुन्हा जोरदार आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्व कार्यालये बंद करून प्रशासकीय कार्यालयांना कोणतेही कामकाज करू दिले जाणार नाही. तालुक्यातील सर्वच शाळांवरील विद्यार्थ्यांचे आई-वडिल आणि तालुक्यातील युवक-युवती शासनाला सळो की पळो करतील. याची दखल शासनाने घ्यावी असे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -