घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात ६८२ अंगणवाड्या इमारतींविना

जिल्ह्यात ६८२ अंगणवाड्या इमारतींविना

Subscribe

निधी व जागेचा अभाव; चालू वर्षात 163 अंगणवाड्यांना मिळेल इमारत

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जिल्ह्यातील 682 अंगणवाड्यांना अद्याप हक्काची इमारत मिळालेली नाही. यातील 174 अंगणवाड्या तर आजही गावातील समाजमंदिर किंवा सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतींमध्ये भरतात. अपूर्ण निधी तर काही ठिकाणी इमारतीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या गावांतील बालकांच्या डोक्यावर हक्काचे छत उभे राहिले नसल्याचे सांगितले जात आहेे.

नाशिक जिल्ह्यात एकूण 4 हजार 776 अंगणवाड्या तर 510 मिनी अंगणवाड्या आहेत. आदिवासी व बिगर आदिवासी तालुके अशा स्वरुपात जिल्ह्याची विभागानी होत असल्यामुळे त्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी भागासाठी सुमारे 13 लाख तर बिगर आदिवासी तालुक्यांमधील अंगणवाडीच्या बांधकामासाठी 11 लाख रुपयांची तरतूद आहे. मिनी अंगणवाड्यांना इमारत बांधण्यासाठी निधी मिळत नाही. आशा परिस्थितीत जिल्ह्यातील 682 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत बांधता आलेली नाही. यात बिगर आदिवासी तालुक्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. ग्राम पंचायतीकडे इमारत बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही किंवा जागा आहे तर, निधीची तरतूद झालेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांमधील बालकांची इतरत्र बसण्याची तात्पुरती व्यवस्था महिला व बालकल्याण विभागाने केली आहे. चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये या विभागाला 17 कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यातून 163 अंगणवाड्यांना इमारती देण्याची तरतूद केली आहे. परंतु, उर्वरित ठिकाणी इमारत केव्हा उभ्या राहणार, हा प्रश्न अनुउत्तरितच आहे.

- Advertisement -
बोलके आकडे
  • एकूण अंगणवाड्या : ४७७६ 
  • आदिवासी भागातील अंगणवाड्या : २४८५
  • बिगर आदिवासी तालुक्यांतील अंगणवाड्या : २२९१
  • मिनी अंगणवाड्या : ५१०
  • अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत : ४०९४
  • ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेतील अंगणवाड्या : २०५
  • समाजमंदिर, सार्वजनिक वाचनालयातील अंगणवाड्या : १७४
  • इतर ठिकाणी भरणार्‍या अंगणवाड्या : ३०३
  • अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही : ६८२

 

चालू आर्थिक वर्षात 163 अंगणवाड्यांसाठी निधीची तरतूद केली आहे. जागेअभावी अंगणवाड्यांना इमारती मिळालेल्या नाहित. अपूर्ण असलेल्या कामांचा पाठपुरावा करुन ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. : दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -