देशात गेल्या 24 तासांत अडीच हजार नवे कोरोनाबाधित, आतापर्यंत 218 कोटी लसीकरण

gujarat corona xe variant mumbai patient inside detail XE spreading fast but no need to panic says medical experts

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 2 हजार 529 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.07 टक्के इतका आहे. तर, या 24 तासांत 3 हजार 553 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतातील कोविड-सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 32 हजार 282 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.7 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 553 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 40 लाख 43 हजार 436 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा 98.74 टक्के इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.07 टक्के इतका असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.38 टक्के इतका आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या सुमारे 89 कोटी 62 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 1 लाख 22 हजार 57 चाचण्या करण्यात आल्या.

आतापर्यंत 218 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. तर, 21 जून 2021 पासून या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला. राष्ट्रव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण 218 कोटी 84 लाख (2,18,84,20,182) मात्रा देण्यात आल्या आहेत.