घरक्राइमसुसाईड नोटमधील ‘त्या’ दोघांवर गुन्हा

सुसाईड नोटमधील ‘त्या’ दोघांवर गुन्हा

Subscribe

जगताप दाम्पत्य आत्महत्याप्रकरण : पोलिसांकडून बँक व्यवहारांची तपासणी सुरु

इंदिरानगर : आर्थिक फसवणूक आणि पैशांसाठी दोन जणांनी सातत्याने कॉल केल्याने जगताप दाम्पत्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पोलिसांना फ्लॅटमध्ये डायरी सापडली असून, सुसाईड नोटमध्ये पैशांसाठी तगादा लावणार्‍या दोन व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जगताप दाम्पत्याच्या बँक व्यवहरांची तपासणी सुरु केली आहे. संशयित युनूस मनियार आणि मयूर बैरागी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील गौरव जितेंद्र जगताप (वय २९) आणि नेहा गौरव जगताप (वय २३, रा. पाथर्डी फाटा या दांपत्याने रविवारी (दि.१८)रात्री पावणे नऊ वाजेच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून जगताप दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . गौरव आणि नेहाचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.

- Advertisement -

गौरवने कंपनीतील काम काही दिवसांपूर्वी थांबविले असल्याचे पोलिसांनी सांगितले. जगताप दांपत्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहून ठेवली होती. पोलिसांना ती पंचनामा करताना सापडली. त्यात संशयित मयूर बैरागी आणि युनुस मणियार या दोघा खासगी सावकारांचा उल्लेख केल्याचे आढळून आले. या दोघांनी जगताप दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर देवरे करत आहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -