घरक्राइमखाजगी बसच्या धडकेत माजी पोलिस कर्मचारी जागीच ठार

खाजगी बसच्या धडकेत माजी पोलिस कर्मचारी जागीच ठार

Subscribe

पंचवटी : क्रांती नगर परिसरात मातोश्री ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एम.एच. ४३ एच. ३५५७ ची धडक लागून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दिलीप विक्रमसिग वळवी हे १२:३० वाजेच्या सुमारास क्रांती नगर कडून मखमलाबादच्या दिशेने आपल्या लाल रंगाच्या मोपेड गाडी क्रमांक एम.एच. १५ डीए ३२१३ हिच्या वर जात असताना ओव्हरटेक करतांना दुचाकीच्या आरश्याला बसचा धक्का लागला आणि त्यांचा तोल गेला. तोल गेल्याने ते काही अंतर रस्त्यावर घसरत गेले त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणात बस आणि बस चालक पोलीस ठाण्यात नेले असून पुढील कारवाई सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -