घरमहाराष्ट्रनाशिक..अन् डोळ्यांसमोर उभा राहिला कापडणीसांंच्या खूनाचा थरार - .. - .. -

..अन् डोळ्यांसमोर उभा राहिला कापडणीसांंच्या खूनाचा थरार – .. – .. –

Subscribe

आरोपीने पोलिसांना सांगितला खूनाचा घटनाक्रम

नाशिक : पोलिसांच्या रेकॉर्डवर कधीही नसलेल्या आणि झटपट श्रीमंतीसाठी थंड डोक्याने कापडणीस बाप-लेकांचा खून व पुरावे नष्ट करणार्‍या मुख्य सूत्रधार राहुल जगताप याला नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२०) पालघर जिल्ह्यातील मोखाडा हद्दीतील घटनास्थळी नेले. पोलिसांनी घटना जशीच्या तशी उभी करत राहुल जगतापकडून खूनाचा थरार जाणून घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही पुरावे संकलित केले असून, पुराव्यांनुसार पोलिसांना नानासाहेब कापडणीसांच्या खूनाचा घटनाक्रम जुळवण्यात यश आले आहे.

 नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांच्या खूनप्रकरणात न्यायालयाने १६ फेब्रुवारीला राहुल जगतापला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी पालघर व अहमदनगर पोलिसांसमवेत वेगाने तपास सुरू केला असून त्याच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तपासासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली आहे. सरकारवाडा पोलिसांनी शनिवारी त्याला तपोवनातील एसटीपी प्लांट परिसरात नेले होते.

- Advertisement -

 या ठिकाणी त्याने मृत कापडणीस यांच्या लॉकर, सदनिका व अन्य मालमत्तांच्या चाव्या फेकल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना काही आढळून आले नाही. रविवारी पोलिसांनी जगतापला मोखाड्यात घटनास्थळी नेले. त्याने नानासाहेब कापडणीस यांचा ज्या ठिकाणी खून केला, त्या ठिकाणचा पत्ता सांगितला. खून कसा केला, मृतदेह फेकला ते ठिकाण, पुरावे कसे नष्ट केले याची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -