घरमहाराष्ट्रनाशिकआंदोलनाच्या प्रयत्नात असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नाशकात अटक

आंदोलनाच्या प्रयत्नात असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नाशकात अटक

Subscribe

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर निषेधाचा प्रयत्न

नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावरील आंदोलनाचा प्रयत्न रविवारी (दि.२०) पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी डॉ. पवार यांच्या घराकडे घोषणाबाजी करत निघालेल्या शहर काँग्रेस कार्यकर्त्यांना अशोक स्तंभ परिसरात रोखल्यानंतर पोलिस व पक्ष कार्यकर्त्यांना बाचाबाची झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशार दिला. त्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर ठिकाणीही अशी आंदोलने झाली. रविवारी शहर काँग्रेसचे प्रभारी ब्रिज किशोर दत्तजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते नाशिकमधील अशोकस्तंभ भागातून गंगापूररोडवरील त्यांच्या घराकडे घोषणाबाजी करत निघाले होते.

- Advertisement -

मात्र, त्यांना पोलिसांनी तिथेच अडवले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोदी आणि केंद्रातल्या भाजप सरकारचा निषेध केला. आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, वत्सला खैरे, राहुल दिवे, निलेश खैरे, उध्दव पवार, आशा तडवी, समीर कांबळे, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, हानिफ बशीर, वसंत ठाकूर, मुन्ना ठाकूर, लक्ष्मण धोत्रे, कैलास कडलग,सुचेता बच्छाव, दिनेश निकाळे, विजय पाटील, विजय राऊत, जावेद इम्राहीन, ज्युली डिसुजा, शब्बीर पठाण, जावेद पठाण, सिध्दार्थ गांगुर्डे, संतोश हिवाळे आदी उपस्थित होते.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -