घरमहाराष्ट्रनाशिकतब्बल ८५ दिवसांनंतर दोन लालपरी रस्त्यावर

तब्बल ८५ दिवसांनंतर दोन लालपरी रस्त्यावर

Subscribe

खासगी कंत्राटी चालकाच्या माध्यमातून मनमाड आगारातून नाशिकसाठी सोडण्यात आल्या बस

मनमाड : अखेर तब्बल 85 दिवसांनंतर दोन लालपरी आज (मंगळवार) मनमाडच्या आगारातून बाहेर पडल्या या दोन्ही एसटी बस खासगी कंत्राटी चालकाच्या माध्यमातून नाशिकसाठी सोडण्यात आल्या एसटी सुरु झाली असल्याचे पाहून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे संपकरी कामगार कदाचित विरोध करतील म्हणनू बस स्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपकरी कामगारांनी एसटी सोडण्यास कोणताही विरोध न करता जोरदारपणे घोषणाबाजी केली.

खासगी चालकाला एका दिवसाची ट्रेंनिग देऊन त्याच्या हातात लालपरी देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला असून सरकारने कितीही दडपशाही केली तरी जोपर्यंत महामंडळाचा विलिनीकरण होत नाही तोपर्यंत दुखवटा मागे घेणार नसल्याचा निर्धार संपकरी कामगारांनी व्यक्त केला आहे. तर आगामी काळात आणखी खासगी चालक उपलब्ध होणार असल्यामुळे एसटीची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती आगर प्रमुख लाड वंजारी यांनी दिली.

खासगी चालकांना कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग देण्यात आलेले नसताना त्यांच्या हाती बस देऊन महामंडळ प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहे. काही दिवसांपूर्वीच खासगी चालकाने एसटीचा अपघात केला. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा अप्रशिक्षित चालकांना एसटी चालविण्याची मुभा दिली गेल्यास प्रवाशांच्या जिवाला धोका असेल. विलगीकरणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. – संतोष कुटे, संपकरी एसटी चालक, मनमाड

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -