घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: ड्रोन इंडस्ट्रीला केंद्र सरकार कसं देणार बूस्टर, जाणून घ्या 'ड्रोन...

Budget 2022: ड्रोन इंडस्ट्रीला केंद्र सरकार कसं देणार बूस्टर, जाणून घ्या ‘ड्रोन शक्ती’ काय आहे?

Subscribe

केंद्र सरकारकडून ड्रोन इंडस्ट्रीला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ड्रोन इंडस्ट्रीला मजबूत करून त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्याचा केंद्राचा माणस आहे.

केंद्र सरकार ड्रोन इंडस्ट्रीला बूस्टर देण्याचे काम यंदाच्या वर्षात करणार आहे. देशात ड्रोन शक्तीवर भर देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ड्रोन शक्तीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आगामी वर्षात ड्रोनचा वापर सेवा म्हणून करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकार या ड्रोन क्षेत्रात स्टार्टपला चालना देणार असल्याचे निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत. देशातील तरुणांना ड्रोन इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचा असल्यास केंद्राकडून मदत करण्यात येणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने ड्रोन तंत्रज्ञान अत्याधुनिक पातळीवर नेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. ड्रोन शक्तीची घोषणा करण्यामागील हे मुख्य कारण आहे. ड्रोनबाबत केलेल्या घोषणेमुळे असे स्पष्ट होत आहे की केंद्र सरकारचा दृष्टिकोण ड्रोन उद्योग वाढवण्याबाबत आहे. ड्रोन शक्ती आणि किसान शेतकऱ्यांना शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांना मदत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सीमेवर ड्रोनचा वापर

देशात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. परंतु सीमेवर ड्रोनचा वापर करण्यावर जास्त भर दिला जात आहे. सीमेच्या सुरक्षा मुद्द्यावर ड्रोन तंत्रज्ञानावर वेगाने काम सुरु करण्यात आले आहे. देशात सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठी ड्रोन उद्योगाला प्रोत्साहन देण्यातयेत आहे. केंद्राने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबतच्या वादातही ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ड्रोनवर अधिक लक्षकेंद्रीत करेल.

शेतीच्या कामात होणार ड्रोनचा वापर

देशात ड्रोनचा वापर शेतातील पीकाची ओळख पटवण्यात, जमीनीचे मोजमाप, कीटकनाशक फवारणी करण्यासाठी होत आहे. तसेच कोरोना काळात ड्रोनचा वापर दूरवर तसेच डोंगराळ भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लस पोहोचवण्यात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून या कामांमध्ये अधिक ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकार यासाठी शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून ड्रोन इंडस्ट्रीला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ड्रोन इंडस्ट्रीला मजबूत करून त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्याचा केंद्राचा माणस आहे.


हेही वाचा : Union Budget 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MSPबाबत सरकारकडून आश्वासनं, कोणत्या पिकांना होणार फायदा?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -