घरमहाराष्ट्रनाशिकबनावट स्वाक्षरी प्रकरणी पुन्हा गुन्हा

बनावट स्वाक्षरी प्रकरणी पुन्हा गुन्हा

Subscribe

महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शिपायाने घातला बेरोजगारांना कोट्यवधींची गंडा

महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शिपायाने बेरोजगारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सचिन जिभाऊ सूर्यवंशी (रा.नाशिक) या शिपायाने महापालिकेतील विविध पदांवर नियुक्तीचे पत्र अनेकांची फसवणूक केल्याचे उघड आले आहे. याप्रकरणी महापालिकेचे सहायक अधीक्षक पंडित शिवाजी शिंदे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सूर्यवंशी याने जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१७ दरम्यान बेरोजगारांना महापालिकेच्या साधनसंपत्तीचा दूर उपयोग केला.

तत्कालीन आयुक्तांच्या नावे बनावट स्वाक्षर्‍या करून महापालिकेतील कनिष्ठ अभियंता, लेखापाल, लिपिक, शिपाई अशा विविध पदांवर नियुक्ती करण्याचे बनावट आदेश दिले. नोकरीला लावून देण्याचे बेरोजगारांना आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यातून त्याने महापालिकेची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्यावर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -