घरउत्तर महाराष्ट्रअमित ठाकरे पुन्हा नाशकात, शहरभरातील गणेशोत्सव मंडळांना देणार भेट 

अमित ठाकरे पुन्हा नाशकात, शहरभरातील गणेशोत्सव मंडळांना देणार भेट 

Subscribe

नाशिक : मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केल्याच मागील काही महिन्यात दिसून आल आहे. अगदी आठवड्याभरात अमित दुसऱ्यांचा नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मागील रविवारी (दि. १७) लोकसभा मतदारसंघाचा आढावा तसेच मनविसे कार्यकारणी नियुक्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. २६) पुन्हा नाशिकमध्ये दाखल होत आहेत. यावेळी दोन दिवस अमित ठाकरे शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मंडळांना भेटी देणार आहेत.

राज्यसह देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहचला आहे. आगामी लोकसभा तसेच संभाव्य विधानसभा यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही गणेशोत्सवात जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याच बघायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणूक न लढवलेल्या मनसेनेही यंदा लोकसभेसाठी कंबर कसली आहे. त्या दृष्टीने तयारीलाही वेग आला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला आहे. याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे शहरातील विविध मंडळांना भेटी देणार आहेत. मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसात अमित ठाकरे एकूण ३२ मंडळांना भेटी देत गणारायाचे दर्शन घेणार आहेत. तसेच काही खासगी ठिकाणीही भेट देणार आहेत. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -

गणेश दर्शनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन 

अमित ठाकरे दोन दिवस शहरभरातील तसेच सिन्नर, पळसे या ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळांना भेटी देणार आहेत. या दौऱ्याची स्थानिक पातळीवर जोरदार तयारी करण्यात येत आहे. अमित ठाकरे ज्या-ज्या भागात जातील त्याठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे तसेच मनविसेची युवा टीमही त्यांच्या सोबत दीमतीला असणार आहे. यातून शहरभरात शक्तिप्रदर्शन करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -