घरक्राइमपॉलिशच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेचे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेचे दागिने लंपास

Subscribe

वणी : पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या व कानातील टॉप्स असा एकूण दोन लाख 40 हजारांचे सुवर्णलंकार लंपास केला. ही घटना दिंडोरीमधील विजयनगरमध्ये घडली. याप्रकरणी शैला उत्तम देशमुख (वय 62) यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील विजयनगरमधील गल्लीतील कृष्णाई बंगल्यात देशमुख कुटुंबीय वास्तव्यास आहेत. शैला देशमुख यांना सोन्याचे दागिने पॉलिश करुन देतो, अशी बतावणी दोन अनोळखी व्यक्तींनी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवत देशमुख यांनी एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, दोन पदरी सोन्याची पोत, दोन तोळे वजनाच्या हातातील पाटली बांगडी, 30 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असे सुवर्णलंकार पॉलिशसाठी देभमुख यांच्याकडून घेतले व पॉलिशचा बहाणा करत सुवर्णलंकार घेऊन पोबारा केला. पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -