घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात होणार वारकरी भवन; केंद्रीय मंत्री भागवत करडांची पाठपुरावा करण्याची ग्वाही

नाशकात होणार वारकरी भवन; केंद्रीय मंत्री भागवत करडांची पाठपुरावा करण्याची ग्वाही

Subscribe

पंचवटी : वारकरी संप्रदायातील सहायक, गुणीजनांना शासनाचे आर्थिक सहाय्य मिळावे, संत वाड्मय भारतीय तत्वज्ञान, धर्मशास्त्रे यांची पुस्तके उपलब्ध व्हावीत, नाशिकमध्ये वारकरी भवन उभे राहावे या वारकर्‍यांच्या मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही केंद्रिय वित्तराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

पंचवटीत आयोजित राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय वारकरी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप, हभप त्र्यंबकराव गायकवाड, हभप माणिकराव देशमुख, हभप पुंडलीकराव थेटे, हभप भरतानंद सांगळे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी होते. अनेक वर्षापासून रामाचे मंदिर अयोध्येत व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. २०२४ च्या आत राममंदिर पूर्ण होईल. आपण भाग्यवंत आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा सुवर्णक्षण आपल्याला पहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये गेल्या सिंहस्थावेळी राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार होते. त्यावेळी आम्ही कोणताही निधी कमी पडू दिला नाही. आतादेखील तीन वर्षांनी येणार्‍या सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द डॉ. कराड यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

पहिल्या सत्रात श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी गुरूकुल व वृध्दसेवा सदन नाशिकचे हरिकीर्तन प्रवक्ते हभप गंगाधर महाराज कवडे यांचे मार्गदर्शन झाले. दुसर्‍या सत्रात शहरातील वारकरी संप्रदायिक कार्यक्रमातील अडचणी, वारकरी प्रवचन, कीर्तनकार, कथाकार यांच्या समस्या व त्यावर शासन दरबारी पाठपुरावा कसा करता येईल, यावर मंथन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -