घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस चौकीवर हल्ला, वाहनांचीही तोडफोड

पोलीस चौकीवर हल्ला, वाहनांचीही तोडफोड

Subscribe

मद्यधुंद टोकळयाने रविवारी, ९ जूनला पहाटे नारायणबापू नगर भागातील पोलीस चौकीवरच गुंडांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात गुंडांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली.

मद्यधुंद टोकळयाने रविवारी, ९ जूनला पहाटे नारायणबापू नगर भागातील पोलीस चौकीवरच गुंडांनी हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात गुंडांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. दरम्यान, पोलिसांनी या टोळीला लगेचच अटक करत सकाळी त्यांची परिसरातून धिंड काढली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास येथील नारायण बापूनगरमधील चौकात काही गुंडांनी मद्यधुंद अवस्थेत दुचाकी (एमएच १५ ईडी ५०८५, एमएच १५, एफसी ६३८४)  आणि चारचाकी  (एमएच १५, डीई २७२७, व मारुती एमएच ०४, ईएच ५९९२) या वाहनांची तोडफोड केल्याचा फोन उपनगर पोलिसांना आला. ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाकले व गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तोडफोड करणारे टोळके येथील पोलीस चौकीसमोर येऊन दगडफेक सुरू केलेली होती. पोलीसांनी तातडीने कारवाई करत किरण तुकाराम घाटोळे, सचिन तोरणे, रतीक अशोक पगारे, आकाश अनील भोर (सर्व रा. जेलरोड, नाशिकरोड) या चौघांना जेरबंद केले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

रविवारी सकाळी १० वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी या गुंडांची धिंड काढली. त्यांच्याविरुद्ध दगडफेक, मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करुन दहशत माजविण्याचे प्रकार घडत असून, सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्या टोळक्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -