घरमहाराष्ट्रडोंबिवलीमध्ये भररस्त्यात कोसळलं झाड

डोंबिवलीमध्ये भररस्त्यात कोसळलं झाड

Subscribe

दोन ऑटोरिक्षाचें झाले नुकसान; एक महिला किरकोळ जखमी

डोंबिवली पूर्व भागात आयरे रोडवरील स्वामी शाळेजवळील असणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर मोठे झाड कोसळले. तेथील नजकीच असणाऱ्या हेरंब बिल्डिंग समोर ही घटना घडली. या घटनेमध्ये झाड पडून दोन ऑटोरिक्षाचे नुकसान झाले असून, एक महिला किरकोळ जखमी झाली.

- Advertisement -

या जखमी झालेल्या महिलेवर जवळच असणाऱ्या दवाखान्यात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र तिचे नाव कळू शकले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेले झाड उचलण्याचे काम सुरू आहे. हे भररस्त्यात कोसळणारं झाड कमकुवत अवस्थेत होते. या आयरे रोडवरून एक जेसीबी गेल्यानंतर त्याचा धक्का झाडाच्या फांदीला बसल्याने हे झाड पडल्याची घटना घडली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -