घरमनोरंजनबिग बॉस मराठी २ WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत

बिग बॉस मराठी २ WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत

Subscribe

आज होणार सिझन २ चे पहिले एलिमनेशन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून या घरात भांडण असो वा घरामध्ये झालेले टास्क असो सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. या सिझन २ च्या या WEEKEND च्या डावामध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर घरातल्या सदस्यांशी चर्चा करत बिग बॉस मराठी सिझन २ मधलं पहिले एलिमनेशन आज पार पडणार आहे. पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे बघणे प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.

कोण या घरातून जाणार बाहेर 

अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामधील संभाषणामुळे कार्यक्रमामध्ये बरीच रंगत येणार आहे. महेश मांजरेकर यांनी बिचुकले यांना सुरेखाजींना काही प्रश्न इंग्लिश मध्ये विचारण्यास सांगितले आणि त्यावरून बरीच गंमत झाली. तर घरामध्ये एक टास्कदेखील खेळण्यात येणार आहे. विणा आणि शिवानी या दोघींना एक टास्क पार पाडवा लागणार आहे, ज्यामध्ये महेश सर घरच्यांना प्रश्न विचारणार आणि ज्याला जास्त वोट मिळतील त्याच्यावर थंडगार पाण्याचा वर्षाव होणार आहे. त्यामुळे कोण या घरातून बाहेर जाणार हे प्रेक्षकांकरिता बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

WEEKEND च्या डावामध्ये नेमके काय होणार?

नुकताच विणा आणि शिवानी मध्ये झालेल्या वादाचा निकाल लावण्यासाठी सिझनचा पहिला खटला घरामध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी शिवानी सुर्वेला निर्दोष ठरवले. परंतु या सगळ्यामध्ये अभिजीत बिचुकले शिवानीच्या बाजूने असल्याचे विणाने व्यक्त केले. याबरोबर घरात पार पडलेल्या टास्क बद्दल आणि इतर वादांबद्दल देखील इतर सदस्यांशी महेश मांजरेकर बोलले. आता या बोलण्याने शिवानीच्या वागण्यामध्ये आणि इतर सदस्यांदच्या वागण्यामध्ये देखील काही बदल होईल का ? याकरिता प्रेक्षकांना येणाऱ्या पुढील भागांची वाट पहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -