घरक्राइमसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे टाळा, अन्यथा..; कोल्हापूर, नगरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे टाळा, अन्यथा..; कोल्हापूर, नगरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क

Subscribe

नाशिक : कोल्हापूरसह राज्यातील विविध शहरात तणावमय परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस अलर्ट झाले आहेत. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, सामाजिक तेढ निर्माण करतील, असा कोणताही मजकूर, फोटो व पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर प्रसारीत करु नये, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे. एखाद्याने आक्षेपार्ह पोस्ट, फोटो व मजकूर प्रसिद्ध केल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावमय परिस्थिती आहे. कोल्हापूरसह इतर शहरात आंदोलन सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी अलर्ट होत नाशिककरांना आवाहन केले आहे. सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारीत करु नये. तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील, असं स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करुन प्रसारित करणार्‍या विरोधात कारवाई करण्यात येईल. यासाठी नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ ही व्यवस्था चालू केली आहे. पोलिसांकडून नाशिककरांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सामाजिक सलोख्याला बाधा येईल किंवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकुर समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये. तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल. : दानिश मन्सुरी, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -