घरमहाराष्ट्रनाशिककसमादेचा बल्लवाचार्य सुख, दु:खाचा आचारी

कसमादेचा बल्लवाचार्य सुख, दु:खाचा आचारी

Subscribe

सर्व जाती, धर्माच्या कार्यक्रमांना पुरवतात मोफत भोजनावळ

वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यवसायात नफ्याचे गणित बघितले जात असताना बागलाण तालुक्यात बल्लवाचार्य अर्थात राजेंद्र रामचंद्र जाधव हा ध्येयवडा, अवलिया विनामूल्य भोजन पुरवून अनोख्या पध्दतीने समाजकार्य करत आहे. समाजसेवाचा हाती घेतलेला हा वसा त्याने गेल्या ३६ वर्षांपासून अविरतपणे जोपासला आहे. जाती धर्माच्या भिंती ओलांडून गरीब असो वा श्रीमंत या सर्वांच्या सुख, दु:खात विनामूल्य स्वंयपाक करणारा बल्लवाचार्य आता आचारी म्हणून सर्वत्र परिचित झाला आहे. महत्वाचे म्हणजे अशा प्रकारची भोजनसेवा करणारी जाधव परिवारातील ही तिसरी पिढी आहे.

विंचुरे गावातील रहिवासी रामचंद्र जाधव यांनी प्रथमत: या उपक्रम हाती घेतला. वडिलोपार्जित २० एकर जमिनीवर विविध पीके घेवून परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून लौकिक मिळवणारे जाधव यांच्या पश्चात त्यांचे मुलगे देवमन जाधव व बाबुराव जाधव यांनी वडिलांचे समाज सेवेचे हे विलक्षण काम पुढे निरंतर चालू ठेवले आहे. या कुटुंबातील राजेंद्र जाधव हे तर आदिवासी, कोकणी पट्ट्यात आपल्या हाताच्या चवीमुळे प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. हजारो लोकांना चविष्ट जेवण बनविण्याचा राजेंद्र यांचा हातखंडा वाखानण्याजोगा आहे. विवाह सोहळा, वाढदिवस, नवसाची भोजनावळ, उत्तरकार्याचे भोजन बनविण्यासाठी सदैव तत्पर असणारे राजेंद्र स्वत:च्या वाहनाने पदरमोड करून कार्यस्थळी पोहचतात आणि स्वयंपाकाचे काम संपल्यावर मंडपातच पाहुण्यांसह स्वत:च्या घरून आणलेली शिदोरी उघडून खातात, हे त्यांच्या स्वभावाचे गुणवैशिष्ठ्य सर्वत्र चर्चेले जात आहे.

- Advertisement -

अनोखा उपक्रम आदर्शवत

यजमान पक्षाचा भोजनावर होणारा प्रचंड खर्च पाहून त्यांच्या कार्याला आर्थिक स्वरूपात नव्हे तर या मार्गाने त्यांनी हातभार लावला. राजेंद्र जाधव यांनी हाती घेतलेला हा अनोखा उपक्रम आदर्शवत तर आहेच, शिवाय समाजसेवेचे काम करणार्‍यांसाठी मापदंड ठरावा. – रवींद्रकुमार जाधव, सामाजिक समस्या विश्लेषक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -