घरक्राइमसावधान! तुम्ही खात असलेले तूप, पनीर बनावट टीआर नाही ना ?

सावधान! तुम्ही खात असलेले तूप, पनीर बनावट टीआर नाही ना ?

Subscribe

बनावट तूप, पनीर बनवणारे कारखाने उद्ध्वस्त

नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी (दि. २६) नाशिकमध्ये बनावट पनीर आणि तूप, दूध पावडर बनवणारे दोन कारखाने अन्न औषध प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. मधूर डेअरी असे या कारखान्याचे नाव असून, बनावट खाद्यपदार्थांच्या बाबतीत घडलेली १५ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने शहरात खळबळ उडली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी अंबड आणि म्हसरुळ या दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे 12 लाख 97 हजार रुपयांचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही कारखाने सील करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विभागाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्यावर सातत्याने कारवाई केली जात असून, शुक्रवारच्या कारवाईत पुन्हा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाने एक कोटीहून अधिक रकमेचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला होता. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अमित रासकर व एस. के. पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड येथील मे. मधूर डेअरी अ‍ॅण्ड डेली नीड्स या आस्थापनेवर धाड टाकण्यात आली. याठिकाणी आप्पासाहेब घुले (वय 39) हे पदार्थांची विक्री करताना आढळले. अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कोणताही वैद्य परवाना त्याच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेला नसल्यामुळे घुले यांच्याकडील पनीर ऍसिटिक ऍसिड रिफाइंड पामोलीन तेल आणि तूप यांचा एकूण दोन लाख 35 हजार 796 रुपयांचा साठा जप्त झाला.

- Advertisement -

पथकाने म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या आस्थापनेवरही धाड टाकली. येथे तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे आढळले. त्या ठिकाणी दूध पावडर, रिफाइंड पामतेलाचा साठा उपलब्ध असल्याने हे पनीरचे नमुने तसेच भेसळयुक्त पदार्थांचे नमुने घेऊन त्यांचा ९ लाख 67 हजार 315 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -