घरदेश-विदेशसेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा हल्लाबोल

सेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायजॅक असल्याच्या चर्चांवरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे नाहीत नाही. ते मेळावा घेणार का याची कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार का याची देखील कल्पना नाही, गृहमंत्री म्हणून एवढचं सांगू शकतो की, दसरा मेळाव्याबाबत नियमात असेल ते आम्ही करू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या निर्णयावर फडणवीस म्हणाले की, काँग्रेसची स्थिती ही बुडत्या नावेसारखी झाली आहे. अशी टीका त्यांनी केली. अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जास्त बोलणार नाही असही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी

दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात चढाओढ सुरु आहे. या दसऱ्या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला, मात्र पालिकेने हातात आखडता घेतल्याची माहिती समोर येतेय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली, यामुळे शिवसेनेत उभी फूड पडली. शिवसेनेच्या आमदारांसह अनेक खासदार आणि नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले, ज्यानंतर आता शिंदे गटाकडून खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात आला, ज्यावरून आता न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्यामुळे शिवसेनासाठी महत्त्वाचा दसरा मेळावा हिसकवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहे.


हेही वाचा : चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -