घरमहाराष्ट्रनाशिकओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम

Subscribe

मुंबई- आग्रा महामार्गावरील विल्होळी जकात नाका येथे आंदोलन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. आज (दि.26) सकाळी १० वाजता विल्होळी जकात नाका येथे भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणाप्रमाणे शैक्षणिक आणि नोकरीमधील आरक्षणदेखील रद्द होण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजपने केला आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते. नाशिकमध्ये सकाळी १०.३० वाजता विल्होळी जकात नाका येथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात ‘ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो’, ‘ओबीसी सम्मान मे, भाजप मैदान मे’ असे घोषणा फलक होते. ‘भारत माता की जय’,’वंदे मातरम’ यासह या ‘भंकास आघाडी सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय’, ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा आघाडी सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -