घरताज्या घडामोडीDelta Variant च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHOने केली महत्वाची घोषणा

Delta Variant च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHOने केली महत्वाची घोषणा

Subscribe

जगभरात अजूनही कोरोनाचा प्रसार सुरुच आहे. त्यात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट अनेक देशांमध्ये कहत करत आहे. सध्या डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव काही देशांमध्ये वाढताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हेरियंट ८५ देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या फैलावामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने असे आवाहन केले आहे की, ‘ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनी मास्क घालणे सोडू नका. कारण धोकादायक आणि अधिक संक्रमक डेल्टा व्हेरियंटला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क घालणे आणि इतर सुरक्षेचे उपाय करणे सोडले नाही पाहिजे.’

- Advertisement -

हेही वाचा – Delta Plus Variant: डेल्टा व्हेरियंटने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळला ८५ देशांमध्ये – WHO

जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक मारियंगेला सिमाओ म्हणाल्या की, ‘लसीचे दोन डोस घेतल्यानंतर लोकांना आपण सुरक्षित आहे असे वाटू नये. त्यांना त्यानंतरही व्हायरसपासून स्वतःला वाचवण्याची गरज आहे.’

- Advertisement -

सीएनबीसीच्या माहितीनुसार, जागातिक आरोग्य संघटनेच्या हेडक्वॉर्टरमधील एका पत्रकार परिषदेत सिमाओ म्हणाल्या की, ‘एकटी लस सामूहिक संक्रमण रोखू शकत नाही. लोकांना सातत्याने मास्क घालावा लागेल, हवेशीर जागेत राहावे लागले, गर्दीपासून दूर राहावे लागेल आणि हात साफ ठेवावे लागतील. जेव्हा तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेता तेव्हा देखील हे सर्व करणे खूप आवश्यक आहे.’

तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ‘लसीकरण झालेल्या लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल, कारण डेल्टासारखा सर्वाधिक संक्रमक व्हेरियंट काही देशांमध्ये पसरत आहे आणि जगातील एका मोठ्या भागात लस देणे अजून बाकी आहे. भारतात सर्वात पहिल्यांदा डेल्टा व्हेरियंट आढळला. आतापर्यंत डेल्टा व्हेरियंट ८५ देशांमध्ये पसरला आहे.’


हेही वाचा – अतिसूक्ष्म धूलिकण अन् कोरोना विषाणूने ‘या’ शहरांचा धोका वाढला – संशोधन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -