घरमहाराष्ट्रनाशिकसदनिका परस्पर विकत ९९ लाखांचा अपहार

सदनिका परस्पर विकत ९९ लाखांचा अपहार

Subscribe

अपार्टमेंटमधील सदनिकेचा साठेखत करारानामा नोटरी करत बिल्डरने एकाला करून दिला. त्याबदल्यात त्याच्याकडून ९९ लाख रूपये घेतले. त्यानंतर बिल्डरने परस्पर दुसर्‍या व्यक्तील सदनिका विकली.

अपार्टमेंटमधील सदनिकेचा साठेखत करारानामा नोटरी करत बिल्डरने एकाला करून दिला. त्याबदल्यात त्याच्याकडून ९९ लाख रूपये घेतले. त्यानंतर बिल्डरने परस्पर दुसर्‍या व्यक्तील सदनिका विकली. ही घटना संबंधित व्यक्तीला समजताच बिल्डरने फसवणूक करत ९९ लाखांचा अपहार केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी राजेंद्र चिंधुलाल बुरड यांनी फसवणूक करणार्‍या बिल्डरविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. नारायण किशनचंद हेमनानी (वय ५०, रा.नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे.

महात्मानगर येथील झीऑन एलेन्झा अपार्टमेंटमध्ये प्लॅट विक्रीचा व्यवहार १२ ऑगस्ट २०१५ ते २८ ऑगस्ट २०१८ या कालावधीत राजेंद्र बुरड व नारायण हेमनानी यांच्यामध्ये झाला. दरम्यान बुरड यांना सर्व्हे क्र.७२८/१ ते १०.१३ ब ते २५ अ/६९ मधील प्लॉट क्र.१६० यांना क्षेत्र १,०६१ चौरस मीटर प्लॉट मिळकतीवर झीऑन एलेन्झा अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केले. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०२ ही कारपेट व बिल्टअप क्षेत्रासह सामाईक जागेच्या व हक्काच्या वापरासह या सदनिकेची किंमत १ कोटी ५५ लाख अशी ठरविण्यात आली. त्यानुसार हेमनानी यांनी विकत देण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्ट २०१५ रोजी सदनिकेबाबत साठेखत करारनामा बुरड यांना नोटरी करून दिला. त्या बदल्यात बिल्डर हेमनानी यांनी बुरड यांच्याकडून ९९ लाख रूपयांची रक्कम घेतली. कालांतराने हेमनानी याने २०२ क्रमांकाची सदनिका परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विकत बुरड यांची फसवणूक करत ९९ लाखांचा अपहार केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बिल्डर हेमनानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.एन.देशमुख करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -