घरदेश-विदेशसाहित्य, संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर - नयनतारा सहगल

साहित्य, संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर – नयनतारा सहगल

Subscribe

अल्पसंख्याक दहशतीखाली असणे हे कशाचे लक्षण आहे? खोट्या आरोपांखाली त्यांना तुरूंगामध्ये डांबले जात आहे. असे मत लेखिला नयनतारा सेहगल यांनी व्यक्त केलं.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन तर्फे लेखिका नयनतारा सहगल यांना भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकृती अस्वस्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित त्या राहू शकलेल्या नाहीत. पण त्यांनी व्हीडीओद्वारे संवाद साधला. यावेळी भारतात सारे काही अलबेल असल्याचं दाखवलं जातं. मात्र लोकशाही देशातील अल्पसंख्यात दहशतीखाली का,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, जयवंत मठकर, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सुगावा प्रकाशनचे प्रा. विलास वाघ, डॉ. अभिजित वैद्य, प्रा. गीतांजली वैद्य, डॉ. प्राची रावळ आणि  डॉ. नितीन केतकर उपस्थित होते.

अल्पसंख्याक दहशतीखाली असणे हे कशाचे लक्षण आहे? खोट्या आरोपांखाली त्यांना तुरूंगामध्ये डांबले जात आहे. प्रत्येकाला सरकारच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडलं जात आहे. अन्यथा त्यांचा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश केला जातो. राज्य घटनेतील तत्त्वांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवलं जात आहे. साहित्य, संगीतासह सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.

- Advertisement -

 सहगल यांना ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी किरण नगरकर म्हणाल्या, इतिहास खोडून टाकण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. भारतात मोठे पुतळे उभारून काही उपयोग होणार नाही. पुतळे उभारण्यापेक्षा  त्या व्यक्तींचे विचार आमलात आणले पाहिजेत.

तर हिंदूने कधी दहशतवाद केला नाही, पण पंतप्रधानांनी वर्ध्यातील सभेतील हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्यामुळे हिंदूची बदनामी सहन केली जाणार नाही असं म्हणत बाबा आढव यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

साहित्य संमेलनावरून झाला वाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे निमंत्रण इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना देण्यात आले होते. परंतु, आयोजकांनी अचानक त्यांचे निमंत्रण रद्द केले आहे. त्यांना निमंत्रण दिल्यानंतर आयोजकांनी त्यांच्याकडून भाषणाची प्रत मागीतली होती. नयनतारा यांनी त्यांचे भाषण आयोकांना पाठवले होते. त्यानंतर अचानक त्यांना ईमेल आला की, त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनवेळी नयनतारा देशात सुरु असलेल्या वास्तवावर बोलणार होत्या. त्या बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन उफाळलेल्या दंगलीवर बोलणार होत्या. त्याचबरोबर देशातील राजकारणावर बोलणार होत्या. त्यामुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. यावरून मोठा वाद झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -