घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटीच्या कामात अनागोंदी, गोदाघाटावर बेसॉल्टऐवजी सिमेंटचे दीपस्तंभ

स्मार्ट सिटीच्या कामात अनागोंदी, गोदाघाटावर बेसॉल्टऐवजी सिमेंटचे दीपस्तंभ

Subscribe

पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठ सुशोभिकरणाच्या कामावरून वादंग निर्माण झालेले असताना आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. स्मार्ट सिटीने सुशोभिकरणाची कामे करताना टेंडरमध्ये नमूद कामांमध्ये बदल करत महापालिकेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचे समोर आले आहे. गोदाकाठावर उभारण्यात येत असलेले दीपस्तंभ बेसॉल्टऐवजी सिमेंटचे उभारले जात असल्याने ही जनतेच्या पैशांची लूटमार असल्याचा आरोप गोदावरी संवर्धनचे देवांग जानी यांनी केला आहे.

स्मार्ट सिटीकडून गोदाकाठच्या सुशोभिकरणाचे काम करताना पुरातन पायर्‍या तोडण्यात आल्याने नाशिकचा इतिहास पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप गोदाप्रेमींकडून करण्यात आला. इतर कामे सुरु असताना परिसरातील मंदिरांना तडे जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. दरम्यान, आता रामकुंड परिसरात दीपस्तंभ उभारण्यात आले आहेत. हे दीपस्तंभ पूर्णतः बेसॉल्ट दगडात बांधणे आवश्यक असते. मात्र, ठेकेदाराने या कामातही कुचराई केल्याने यावर कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

गोदापात्रात उभारण्यात येत आलेले दीपस्तंभ हे बेसॉल्ट दगडात बांधण्याचे टेंडरमध्ये नमूद आहे. शिवाय एखाद्या अधियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हे उभारण्यात यावेत. प्रत्यक्षात हे काम सिमेंट काँक्रिटमध्ये सुरू आहे. दीपस्तंभाला आकार देण्यासाठी साचाचा उपयोग करण्यात आला आहे. एकूण 34 दीपस्तंभ असून, एकही टेंडरनुसार नाही. : देवांग जानी, गोदावरी संवर्धन समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -