घरमहाराष्ट्रनाशिकनदीपात्र पाहणीत आयुक्तांना कपड्यांचे दर्शन

नदीपात्र पाहणीत आयुक्तांना कपड्यांचे दर्शन

Subscribe

पंचवटी : पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुण्यास मनाई आहे, असे असताना पात्रात कपडे धुणे महापालिका प्रशासनाला अजूनही शक्य होत नाही. महापालिका आयुक्तांचा नदी पात्राच्या पहाणी दौर्‍याच्या वेळी पुलावर चक्क कपडे धुवून वाळत घातल्याचे दिसत असताना, ना त्याकडे महापालिका अधिकारी, ना कर्मचार्‍यांनी लक्ष दिले.
आयुक्तांचा पूर्वनियोजित दौर्‍याच्यावेळीही अशी स्थिती दिसत असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह उपसमितीचा गोदावरी तसेच उपनद्यांची पाणी प्रदूषण पाहणी दौरा शुक्रवारी (दि.१६) चोपडा लॉन्स, रामवाडी पुल, लेंडी नाला आणि ढिकले नगर येथील वाघाडी नदी परिसरात झाला.

गोदावरी नदीच्या प्रदुषणाबाबत जनहित याचिकेवरील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपसमिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीची त्रैमासिक आढावा बैठक विभागीय आयुक्तांकडे घेण्यात येते. या उपसमितीत विभागीय आयुक्त, निरी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, जलसंपदा, महापालिकेसह इतर शासकीय विभागांचे अधिकारी आणि याचिकाकर्ते यांचा समावेश आहे. या समितीच्या पहाणी दौर्‍यात महापालिका आयुक्त होते. ढिकले नगर परिसरातील वाघाडी नदी येथील पाहणी करत असताना चक्क पुलावर कपडे वाळत घातलेले होते. पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा पुर्व नियोजित असून तिथे पालिका कर्मचारी अगोदर पासून आलेले असताना ही त्या पुलाच्या कठड्यावर वाळत टाकलेले कपडे काढण्याची तसदी घेतली नाही. या कपड्यांमुळे शहराचे ओंगळवाणे दर्शन आयुक्तांनाही घडले. यानिमित्ताने नाशिककरांना तुकाराम मुंढे यांच्या दरार्‍याची आठवण झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -