घरमहाराष्ट्रनाशिकआयुक्तांचा मोर्चा आता शाळा रुग्णालयाकडे; स्वच्छतेकडे लक्ष

आयुक्तांचा मोर्चा आता शाळा रुग्णालयाकडे; स्वच्छतेकडे लक्ष

Subscribe

आयुक्त रमेश पवार देणार शाळा रुग्णालयात 'सप्राईज व्हिजिट'

नाशिक : आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील विविध भागातील विकासकामांची पाहणी करणारे आयुक्त रमेश पवार आता आपला मोर्चा महापालिकेचे रूग्णालये, शाळा आणि शहरातील स्वच्छतेकडे वळवला आहे. या सर्व

ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेण्यात येणार असल्याने कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.

- Advertisement -

माजी आयुक्त कैलास जाधव यांच्या जागी मुंबईचे रमेश पवार यांची मनपा आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर पवार यांनी शहरातील सर्व विभागातील विविध ठिकाणांना भेटी देऊन विकास कामांची तसेच अडचणी, समस्यांची पाहणी केली आहे. त्यातही स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे बेजार झालेल्या नाशिककरांची सुटका करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधीत विकामकामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना अल्टीमेटम दिला आहे.

गेल्या एक महिन्यापासून पाहणी दौऱ्यांमुळे चर्चेत आलेले रमेश पवार आता महापालिकेच्या शाळा, रूग्णालयांमधून मनपाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांकडून नागरिक तसेच विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सेवा दिली जाते, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात की नाही याची पाहणी केली जाणार आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, आयुक्त रमेश पवार हे अचानक भेटी देणार असल्याने लेटलतीफ आणि कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शाळांमधील शिक्षण, त्याचा दर्जा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांच्या वेळा याची माहिती घेतली जाणार असून, मनपाच्या रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रूग्णांना दिली जाणारी सेवा याविषयी माहिती घेतली जाणार आहे. रुग्णालये आणि शाळांबरोबरच शहरात होणाऱ्या स्वच्छतेकडे आयुक्त अधिक लक्ष पुरवणार आहेत. त्या अनुषंगाने आयुक्त रमेश पवार यांनी तिन्ही विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची आकडेवारी, त्यांच्या वेळा आणि कामकाजाचे ठिकाण यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मागविली आहे. यामुळे येत्या काळात आयुक्तांच्या या अचानक भेटीतून काय काय समोर येणार, याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -