घरमहाराष्ट्रनाशिककंटेनरच्या भाड्यात वाढ, द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

कंटेनरच्या भाड्यात वाढ, द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

Subscribe

केंद्र सरकारविरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांना मागील वर्षी कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले होते. कोरोनानंतर शेतकरी सावरत होता त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे हाताशी आलेल्या पिकांचेही नुकसान झाले होते. या सर्व परिस्थितीतून शेतकरी आता नव्या पिकांतून उत्पन्न घेतोय. परंतु केंद्र सरकारच्या करवाढीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे पावसाळी पिकांचे नुकसान झाले असल्याने नाशिकमध्ये द्राक्ष हंगाम मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. परंतु केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीवरील सबसिडी बंद केली आहे. तसेच द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंटेनरच्या भाड्यात वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नाशिकमधील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षचे उत्पादन घेतात. परंतु यावर्षी कोरोना संकट आणि त्यात केंद्र सरकारने सबसिडी बंद आणि कंटनेरच्या दरात वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा भाडे द्याव लागणार आहे. नाशिकमधून शेतकरी द्राक्ष विमाना, जहाजातून परदेशात पाठवतात. केंद्र सरकारने द्राक्षांवरील सबसिडी रद्द केल्याने आणि द्राक्ष वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २ लाख पर्यंत भाडे द्यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

- Advertisement -

कोरोना संकट असल्यामुळे आणि केंद्राच्या धोरणामुळे ९० रुपये किलो असलेली द्राक्षे ६५ रुपये किलोच्या भावात विकले जात आहेत. त्यात केंद्र सरकारने दरवाढ केल्याने द्राक्ष उत्पादकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या सरकारने दीड लाख रुपयांची सबसिडी पुन्हा सुरु करावी, कंटेनरच्या दरात केलेली वाढ कमी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सरकारने केलेल्या या दरवाढीवरुन आणि सबसिडी रद्द केली असल्यामुळे शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिवसेना केंद्र सरकारविरोधात मुंबई-आग्रा या महामार्गावर आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेनेने दिला आहे. या आंदोलनाला द्राक्ष शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. यामधून सरकारने आपले निर्णय मागे घ्यावे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -