घरताज्या घडामोडीउत्तराखंड प्रलय: रिषभ पंत मदतीला सरसावला, दान केले एका सामन्याचे मानधन

उत्तराखंड प्रलय: रिषभ पंत मदतीला सरसावला, दान केले एका सामन्याचे मानधन

Subscribe

उत्तरखंडमध्ये रविवारी मोठ्या आपत्तीला समोरे जावे लागले. उत्तराखंडच्या चामोली येथे हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला. पाण्याच्या प्रवाहात गावांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकजण यात वाहून गेले. जवळपास १०० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ही दृष्य पाहून उत्तराखंडमध्ये झालेल्या झालेल्या नुकसानाचे भायवह चित्र समोर येत आहे. क्रिकेटर रिषभ पंत याने उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कठीण काळात सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही रिषभ पंत याने यावेळी केले आहे. चेन्नई कसोटी सामान्याची संपूर्ण फी तो उत्तराखंडच्या आपत्तीग्रस्तांसाठी देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

- Advertisement -

क्रिकेटर रिषभ पंत याने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे, ‘उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून घडलेल्या घटनेविषयी मला खूप दु:ख वाटत आहे. उत्तराखंडच्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी माझ्या सामन्याची संपूर्ण रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठिण काळात सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. बचाव कार्यासाठी सर्वांनी सर्वाधिक मदत करावी असे मी सर्वांना आवाहन करतो’, असे ट्विट रिषभ पंतने केले आहे. त्याचबरोबर ‘उत्तराखंडातील पूरग्रस्तांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. मला आशा आहे की सुरु असलेल्या बचाव कार्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आलेल्या अडचणींना मदत करण्यास आपण सक्षम आहोत’, असेही त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

रिषभ पंतचे उत्तरखंडसोबत एक विशेष नाते आहे. रिषभचा जन्म हा उत्तरखंडमधील हरिद्वार येथील आहे. त्यामुळे उत्तराखंड विषयी त्याचे असलेले प्रेम आणि जिव्हाळा यातून दिसून येत आहे. रिषभ पंतने चेन्नई कसोटी सामान्यात त्याने मिळवलेली सर्व रक्कम तो उत्तरखंडच्या आपत्तीग्रस्तांसाठी देणार आहे.


हेही वाचा – उत्तराखंड : ग्लेशियर बर्स्ट म्हणजे काय ? आऊटबर्स्ट फ्लडची स्थिती कशी निर्माण होते ? जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -