घरमहाराष्ट्रनाशिकसाधुग्रामची जागा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा महानगरपालिकेचा विचार, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

साधुग्रामची जागा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा महानगरपालिकेचा विचार, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

Subscribe

लॉन्ससारखी जागा असल्याने, विवाह सोहळे आणि तत्सम कार्यक्रमांना भाड्याने जागा देण्याचा विचार

नाशिक : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित भूखंडाचा आता महापालिका उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेणार असून, या ठिकाणी लॉन्ससारखी जागा असल्याने, विवाह सोहळे आणि तत्सम कार्यक्रमांना भाड्याने जागा देण्याचा विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्यासाठी येणारे तीन आखाडे आणि त्यांचे सुमारे पाचशे ते सहाशे खालसे यांच्यासाठी तपोवनात जागा उपलब्ध करून दिली जाते. या साधुग्राममध्ये तीन शाही पर्वण्याहोईपर्यंत साधू असतात. त्यानंतर, ते त्यांच्या मुक्कामी जातात. मग पुढील कुंभमेळ्यापर्यंत ही जागा रिकामी असते. काही वेळा अतिक्रमणे होतात, तर काहीबेकायदा बांधकामे झाल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेने भविष्यातील कुंभमेळ्याचा विचार करून, जागा कायम राहाव्या, यासाठी५२ एकर जागा ताब्यात घेतली आहे, तर साडेतीनशे एकर जागा ही ना विकास क्षेत्र म्हणून आरक्षित केली आहे. या जागेवर जागा मालक शेती करतात.

- Advertisement -

मात्र, कुंभमेळ्याच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात ही जागा भाड्याने घेतली जाते. दरम्यानच्या काळात २००२-०३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यानंतर महापालिकेने साडेतीनशे एकर जागेचे टीडीआरद्वारे भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो उपयुक्त ठरला नाही. त्यामुळे ही जागा पडून आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी सोमवारी (दि.२५) घेतलेल्या आढावा बैठकीत सूचना केली होती. आता त्या दृष्टीने जागा भाड्याने देण्याबाबत विचार सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -