घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नरला क्लच वायरचा फास बसून मादी बिबट्याचा मृत्यू

सिन्नरला क्लच वायरचा फास बसून मादी बिबट्याचा मृत्यू

Subscribe

मेंढी-सोमठाणे हद्दीलगत नांदूरमध्यमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीलगतची घटना

सिन्नर तालुक्यातील मेंढी-सोमठाणे हद्दीलगत नांदूरमध्यमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीखाली मृत मादी बिबट्या आढळून आला. शनिवारी (दि. 29) दुपारी 3 च्या सुमारास परिसरातील शेतकर्‍यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

मध्यंतरी पुर्व भागात पावसाने हजेरी लावली होती. पावसाच्या पाण्यात वाहून आलेला व काट्यांमध्ये अडकलेल्या क्लचवायरचा पायाभोवती व कमरेभोवती फास बसला. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना फास अधिकाधिक आवळला गेला. कंबर, पोट व इतर अवयव कापल्याने रक्तस्राव होऊन या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभाग व पशूसंवर्धन अधिकार्‍यांनी दिली. कालव्यालगत दशरथ व संजय गिते यांचे सामाईक क्षेत्र आहे. त्या परीसरात एक शेतकरी शेळ्या चारत असताना शेळ्या या मृत बिबट्या मादीला पाहिल्यावर घाबरला. त्याने आवाज दिल्यानंतर जमलेल्या शेतकर्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल साळवे, टी. एल. थोरात, मधुकर शिंदे, रोहित लोणारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अंदाजे 3 वर्षे वयाची ही मादी होती. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर माळेगाव-मोहदरी वनउद्यानात मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

खराब वस्तूंची योग्य विलेवाट गरजेची

बिबट्या मादी जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना क्लचवायरचा अंगाभोवती फास बसला. त्यातून जीव गमवावा लागला. असा प्रकार परत घडू नये, त्यासाठी सर्वांनी खराब वस्तूंची व्यवस्थितपणे विलेवाट लावावी. अशा घटनेकडे नागरिकांनी संवेदनशीलपणे बघावे. – डॉ. मिलिंद भणगे, पशुवैद्यकीय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -