घरमहाराष्ट्रनाशिक'गटशिक्षणाधिकार्‍यांनी सांगितलेलीच कामे करा'; आ. तांबे यांचे प्राथमिक शिक्षकांना निर्देश

‘गटशिक्षणाधिकार्‍यांनी सांगितलेलीच कामे करा’; आ. तांबे यांचे प्राथमिक शिक्षकांना निर्देश

Subscribe

नाशिक : शिक्षक संख्या कमी असल्याने कामाचा व्याप वाढत असून ग्रामसेवक, तलाठी, तहसिलदार अतिरिक्त कामे सांगतात. यामुळे घरकुले, आरोग्य, बांधकाम विभागाची कामेही करावी लागतात, अशा तक्रारी शिक्षकांनी आमदार तांबे यांच्याकडे केल्यानंतर शिक्षकांना केवळ मतदानाचे कामकाज आणि आपत्ती आल्यास युध्दपातळीवर काम करावे लागेल. इतर कुणीही आपल्याला काम सांगितल्यास गटशिक्षणाधिकार्‍याची परवानगी असेल तरच सांगितलेली कामे करा असे निर्देश आमदार तांबे यांनी शिक्षकांना दिले.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी काल गुरुवारी (दि.8) विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब सभागृहात शिक्षक संघटनांसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची बैठक घेतली.
बैठकीस मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, प्रभारी शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांसह प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बैठकीत शिक्षकांच्या 24 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तर 13 निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

बैठकीत शाळांची आर्थिक फरक बीले, मेडीकल बिले, सेवानिवृत्त शिक्षकांच्या देयकांना होणारा विलंब याबाबत शिक्षक संघटनांनी आमदार तांबे यांच्याकडे तक्रारी केल्या. यावेळी आमदार तांबे यांनी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक संघटनां यांच्यात ताळमेळ घडवून आणित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी काम करावे, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची आम्ही हमी देतो अशी ग्वाही दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांची पदोन्नती दीड वर्षापासून रखडली असल्याचे संघटनांनी आमदार तांबे यांच्यासमोर स्पष्ट केल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांत संचमान्यता येणार असून ती मिळाल्यानंतर त्वरेने 263 मुख्यापकांची मंजूर पदांनूसार पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी शिक्षकांनी केंद्रप्रमुख पदे भरली जात नसल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले असता जून 2023 अखेर या पदांसाठी स्पर्धा परिक्षा घेऊन 122 पदे भर8ली जातील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 608 पदवीधर शिक्षकांची रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेची बदली प्रक्रीया पूर्ण झालेली असून लवकरच लवकरच पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण केली जाईल असे यावेळी शिक्षण विभागाने सांगितले. याशिवाय उशीराने होणार वेतन, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे प्रभारी पदभार, नियमित शिक्षक संघटनांची बैठक घेणे, निवडकश्रेणी प्रस्ताव आदी 15 विषयांवर बैठकीत चर्चा झाली. शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून सदर प्रश्नांवर प्रशासनाशी चर्चा झाली आहे. प्रशासनपातळीवर या प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याने त्यासाठी प्रशासनाला कालावधी निश्चित करून दिला असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.

- Advertisement -

दंगलीचे प्रकार निंदणीयच : आ. तांबे

संगमनेर, कोल्हापूर येथील दंगलीचे प्रकार निंदणीय असल्याचे सांगतांना आमदार तांबे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्वार्थासाठी सध्या तरुणांचा वापर राजकीय पक्षांकडून केला जात आहे. औरंगजेबाचे फोटो अचानक स्टेटस लावण्याचे कारण काय? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. असे प्रयोग कर्नाटक निवडणुकीपूर्वी देखील झाले आहेत हे आपण समजून घ्यायला हवे. विशेषत: युवकांनी यावर सावध प्रतिक्रिया द्यायला हवी. औरंगजेब हा काही आत्ताच लोकांना माहिती झालाय का? मग आत्ताच त्याचे फोटो का झळकू लागले आहेत, त्याचा विचारदेखील तरुणाईने करणे आवश्यक असल्याचेही तांबे यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -