घरमहाराष्ट्रनाशिककर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनल निवडून द्या : बोरस्ते

कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनल निवडून द्या : बोरस्ते

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे, कर्मवीर दुलाजी पाटील, डॉ. वसंतराव पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते यांनी चांदोरी येथील कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित प्रचार सभेत केले.

संस्थेचे ज्येष्ठ सदस्य जगन नाठे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर रामचंद्र पाटील, यशवंत अहिरे, श्रीराम शेटे, नीलीमा पवार, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, मनोहर देवरे, माणिक शिंदे, दिलीप मोरे, दत्ता गडाख, सुरेश कळमकर, प्रल्हाद गडाख, सिंधू आढाव, शंकर कोल्हे-खेडेकर, डॉ. जयंत पवार, निवृत्ती टर्ले, दिलीप गडाख, शिवाजी खालकर, संतू खेलूकर, शिवाजी गडाख उपस्थित होते. बोरस्ते पुढे म्हणाले की, संस्था नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शहरी भागासोबत ग्रामीण भागात सीबीएसई माध्यमांचे शिक्षण दिले जात आहे. गटतट न पाहता सर्वांचे काम करण्याचे कार्य केले असून सर्व निफाडकरांना नीलिमा पवारांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

नीलिमा पवार म्हणाल्या की, सध्याची लढाई वैचारिक असून आपण संस्थेचे काम देवकार्य समजून केले. आरोग्य व शिक्षणासाठी काम करणे हे संस्थेचे कर्तव्य समजून समाजातील सर्व घटकांना सेवा मिळावी यासाठी कोरोनाकाळात जिल्ह्याभरात आठ तपासणी सेंटर उभारून दिलासा दिला. परंतु, विरोधक केवळ अपप्रचार करत आहेत. 11 केसेस या सेवकांच्या विरोधात चालविल्या गेल्या. त्याबाबत सभासदांनी जाब विचारावा तसेच कर्मवीरांच्या घरातील सभासद केले असून कोणतेही बोगस सभासद केलेले नाही. केटीएचएम महाविद्यालयाची जागा कोणीही संस्थेला दिलेली नसून, ती शासनाकडून नजराणा भरून मिळवलेली आहे. त्यासाठी काकासाहेब वाघ यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. विरोधकांनी संस्थेची प्रगती अगोदर समजावून घ्यावी, मग बिनबुडाचे आरोप करावेत, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -